अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ प्रकरणात माजी आमदार शिवाजी कर्डिले निर्दोष !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :- भिंगार येथील जमीन खरेदी व पिस्तुलाने धाक दाखविल्याप्रकरणी नेत्रतज्ञ प्रकाश कांकरिया यांना फसविणे व धमकावल्याप्रकरणी माजी आमदार शिवाजी कर्डिले तसेच प्रकाश कर्डिले व अनिल कर्डिले यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आले होते.

या प्रकरणावर जिल्हा व सत्र न्यायालयात आज सुनावणी झाली. यात तीनही आरोपींची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी व साक्ष विश्‍वासार्ह नसल्याच्या कारणाने निर्दोष मुक्तता केली आहे.

या प्रकरणावर जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यात कांकरिया यांच्याकडून ऍड. प्रकाश कोठारी यांनी बाजू मांडली.

शिवाजी कर्डिले यांच्याकडून ऍड. विश्‍वासराव आठरे पाटील यांच्यासह ऍड. रघुनाथ मुरुमकर, तर प्रकाश व अनिल कर्डिले यांच्याकडून ऍड. सुधीर बाफना यांनी बाजू मांडली.

सर्व उपलब्ध पुरावे व साक्षीदार तपासून न्यायालयाने तीनही आरोपींना सबळ पुराव्याअभावी व साक्ष विश्‍वासार्ह नसल्याच्या कारणाने निर्दोष सोडले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe