अहमदनगर ब्रेकिंग : पत्नीवर नजर ठेवल्याच्या कारणातून झाला ‘त्याचा’ खून !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- पारनेर तालुक्यात राधू सहादू कोकरे ४५ (रा. ढवळपूरी ता. पारनेर) या भटकंती करून उपजिविका करणा-या मेंढपाळाचा अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाने हत्याराने डोक्यात मारून खून करण्यात आला होता.

ओळख पटू नये म्हणून आरोपीने खडकवाडी शिवारात आडरानात प्रेत नेउन ठेवले होते,या खुनाचा उलगडा झाला आहे, अवघ्या चोवीस तासांत पोलिसांनी या खुनातील आरोपीस अटक केली आहे.

राधू कोकरे यांची पत्नी जनाबाई राधू कोकरे ४० (रा. ढवळपूरी, ता. पारनेर हल्ली रा. वायशेत, अलिबाग रायगड) यांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती, ह्या खुनातील आरोपीने हत्याराने खुन केला व मयताला जिवे ठार मारल्यानंतर मारेकऱ्याने कसलाही पुरावा घटनास्थळी राहणार नाही याची पुरेपुर दक्षता घेतली होती.

तरी देखील गोपणीय साक्षीदार तसेच तांत्रिक तपास करुन व त्याआधारे माहीती घेवुन मयताची ओळख पटविण्यात आली. सदर गुन्ह्याच्या तपासकामी पारनेर पो.स्टे चे प्रभारी सपोनि. राजेश गवळी यांनी तपासाची चक्रे जलदगतीने फिरवुन प्राप्त पुरावे, फोटो, जबाब व गोपणीय यंत्रणेच्या आधारे मिळालेल्या माहीतीनुसार

यातील मयत राधु सहादु कोकरे, वय ४५ वर्षे, रा. ढवळपुरी ता. पारनेर, जि. अहमदनगर याने दिनांक २०/०७/२०२० रोजी सुरेश ऊर्फ सहादु राजाराम खताळ, वय ३२ वषे, रा. खारबाडी, ढवळपुरी, ता. पारनेर, जि. अहमदनगर याचे पत्नीसोबत लगट करुन तिच्यावर वाईट नजर ठेवल्याचा सुरेश ऊर्फ सहादु याच्या मनात राग होता

आरोपीस दिनांक २९/०७/२०२० रोजी १५.५३ वाजता अटक करण्यात आली असून आरोपीची मा. न्यायालयाकडुन पोलीस कोठडी रिमांड घेवुन आरोपीकडे विचारपुस करता त्याने त्याचा भाऊ संतोष ऊर्फ लालु राजाराम खताळ रा. ढवळपुरी, ता. पारनेर जि. अहमदनगर याच्या मदतीने मयतास दिनांक २१/०७/२०२० रोजी रात्री खडकवाडी घाटात जिवे ठार मारल्याबाबत कबुली दिली

आरोपी संतोष ऊर्फ लालु राजाराम खताळ यास गुन्ह्यात निष्पन्न करुन त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. अटक आरोपीकडे कसुन चौकशी करुन वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा पुढील तपास योग्य रीतीने सुरु आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment