अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- पारनेर तालुक्यातील मांडओहोळ धरणात लोहमार्ग पोलीस वाहून गेल्याची घटना आज सायंकाळी घडली. गणेश दहिफळे असे वाहून गेलेल्या लोहमार्ग पोलीस कर्मचार्याचे नाव आहे.
रात्री उशिरापर्यंत धरणातील पाण्यात त्यांचे शोधकार्य सुरू होते. गणेश दहिफळे हे आपल्या काही मित्रांसमवेत मांडओहोळ धरणालगत असलेल्या रुईचोंडा धबधबा परिसरात फिरण्यासाठी गेले होते.
मित्रांसमवेत दहिफळे धबधब्यालगत फिरत असताना त्यांचा पाय घसरुन ते पडले. धबधब्याच्या प्रवाहाबरोबर ते धरणात वाहून गेले. पोलीस प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने धरणातील पाण्यात दहिफळे यांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved