अहमदनगर ब्रेकिंग : पोलीस नाईक लाचलुचपतच्या जाळ्यात.!अवघ्या हजार रुपयांसाठी…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- बेपत्ता झालेली विवाहित महिला आढळून आली असता तिचा जबाब नोंदवण्यापूर्वी तिच्या पतीकडून एक हजाराची लाच स्विकारणार्‍या पोलीस नाईक बी. बी. देशमुख यास नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले.

शहरातील घोडेकर माळा परिसरात राहणारी एक महिला गेल्या काही दिवसांपासून मिसिंग होती. ती शुक्रवार दि. 11 डिसेंबर 2020 रोजी मिळून आली होती.

त्यानंतर ही मिसिंग दाखल असल्यामुळे नातेवाईक संबंधित महिलेस घेऊन आज 12 डिसेंबर रोजी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आले होते.

हा तपास पोलीस नाईक देशमुख यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी काही कागदपत्रे पुर्ण करण्यासाठी आणि ही मिसिंग निकाली काढण्यासाठी (जबाब नोंदविण्यास) एक हजार रुपयांची लाच मागितली होती.

त्यानंतर हा प्रकार महिलेच्या नातेवाईकांनी पुर्वीच नाशिकच्या लाचलुचपत पथकाला सांगितली होती. त्यानंतर पोलीस अधिक्षक सुनिल कडासणे यांच्या पथकाने सापळा रचून लाच मागणार्‍या देशमुख यास ताब्यात घेतले. तर याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe