अहमदनगर ब्रेकिंग : या ठिकाणी सुरु होता वेश्याव्यवसाय; पोलिसांनी केला पर्दाफाश !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- शहरासह जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर फोफावत आहे. यामुळे पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान वाढत्या गुन्हयांना आळा बसावा यासाठी पोलिसांकडून ठिकठिकाणी धाडसत्र टाकण्याचे काम सुरूच आहे.

नुकताच शहरात एका ठिकाणी सुरु असलेल्या अवैध धंद्यावर पोलिसांनी छापा टाकून एकाला ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, एमआयडीसी पोलिसांनी बोल्हेगावातील एका लॉजवर छापा टाकून वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. दोन तरूणीची सुटका करत एकाला अटक केली आहे.

तर दोघे पसार झाले आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉजचा मालक सिद्धेश्‍वर कटके, प्रमोद शिवाजी त्रिंब्यके (रा. मार्केटयार्ड, नगर) व सुधीर भालेराव असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत. पोलीस नाईक परशुराम नाकाडे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी प्रमोद त्रिंब्यके याला अटक केली आहे. बोल्हेगावातील गणपती चौकात सिद्धेश्‍वर कटके याच्या लॉजवर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या आधारे उपअधीक्षक पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक मोहन बोरसे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. बोरसे यांच्या पथकातील उपनिरीक्षक दीपक पाठक व कर्मचारी यांनी कटके याच्या लॉजवर छापा टाकला.

यावेळी प्रमोद त्रिंब्यके मिळून आला. पोलिसांनी त्याला अटक केली. तर दोन तरूणीची सुटका केली. छापा पडताच लॉजचा मालक कटके व भालेराव पसार झाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment