अहमदनगर ब्रेकिंग : मुलीवर बलात्कार करून वडिलांना दगडाने ठेचून मारले !

Ahmednagarlive24
Published:
बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याचा राग मनात धरून पीडित मुलीच्या वडिलांची सख्या भावानेच नातेवाईकांच्या मदतीने  दगडाने ठेचुन व चाकू कुऱ्हाड अशा हत्यारांनी भोसकुन खून केल्याची घटना शेवगाव तालुक्यातील सोनविहिर येथे शुक्रवारी घडली.

वृध्देश्वर पुंजाराम काळे (वय ४०) असे मृताचे नाव असून त्याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन सुरेश पुंजाराम काळे रा.सोनविहीर, विकास फुलसिंग भोसले, रवि फुलसिंग भोसले (दोघे रा.मोरचिंचोरा) ता.नेवासा यांच्या विरुध्द शेवगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

आरोपींमध्ये मृताचा सख्खा भाऊ आणि दोन नातेवाइकांचा समावेश आहे. मृताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिस ठाण्यात मृताचा भाऊ आणि विकास फुलसिंग भोसले, रवी फुलसिंग भोसले (दोघे रा. मोरेचिंचोरे, ता. नेवासे) या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे, की माझ्या पतीला पहिल्या पत्नीपासून चार मुले आहेत. माझी मुलगी नातेवाईक विकास भोसले यांच्या घरी पाहुणी म्हणून गेली असता विकासने तिच्यासोबत लग्नासारखे संबंध ठेवले.

त्यामुळे मागील महिन्यात आम्ही विकास भोसले, रवी भोसले व त्यांचे इतर नातेवाईक यांच्याविरुद्ध बलात्काराची फिर्याद दिली. त्याचा राग धरून विकास भोसले, रवी भोसले व माझा दीर हे माझ्या पतीसोबत नेहमी भांडण करीत होते.

पंधरा दिवसांपासून विकास व रवी हे दिराच्या घरी येऊन राहत होते. ‘आपण नातेवाईक असूनही आमच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तुझी मुलगी मला देऊन टाक. मी तिच्याशी लग्न करणार आहे,’ असे विकास म्हणत होता. मात्र, त्यास आम्ही नकार देत होतो.

शुक्रवारी रात्री माझे पती मुलांसह जेवण करत असताना दीर घरी आला व पतीसोबत भांडण करू लागला. थोड्या वेळाने रवी व विकास हेही हातात कुऱ्हाड, चाकू व बांबू घेऊन आले. ‘आमच्यावर गुन्हा दाखल करतोस काय, तुला मारून टाकतो,’ असे म्हणत रवीने पतीच्या छातीत सुरा खुपसला.

पती ओरडत बाहेर पळाले. त्याच वेळी दिराने डोक्‍यावर वार केला. विकासने हातातील बांबूने दोन्ही पायांवर मारले. पती शेजारी राहत असलेल्या सुनील बाबूराव अवचिते यांच्या घराकडे पळाले. दीर, रवी, विकास यांनी पाठलाग करून त्यांना पाडले व दगड उचलून त्याच्या पायावर टाकला.

विकासने पुन्हा पतीच्या छातीवर सुरा खुपसला. आम्ही आरडाओरडा केल्याने तिघेही पळून गेले. नंतर जखमी अवस्थेत पतीला शेवगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता, डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment