अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अज्ञात व्यक्तीने रात्रीतून उभा केला. याबाबतची माहिती तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनील कटके यांना मिळाली असता सदर घटनेची माहिती वरिष्ठांना देऊन ताबडतोब घटनास्थळी फौज फाट्यासह दाखल झाले.
सदरच्या घटनेबाबत बाबतीत स्थानिक ग्रामस्थांना बोलावून विचारपूस केली असता, कोणीही पुढे येऊन माहिती दिली नाही. सदरचा पूर्ण कृती पुतळा बसवलेल्या ठिकाणी सुरक्षेचे कुठलेही पालन केले नव्हते. व पुतळा बसवण्याकरिता कुठलीही शासनाची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे भविष्यात विटंबणा झाल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
यावेळी पोलिस व महसूल प्रशासनाने ग्रामस्थांना स्वतःहून पुतळा काढून घ्यावा. अशी वारंवार विनंती केली, मात्र ग्रामस्थांनी आम्ही पुतळा बसविला नाही, तर आम्ही पुतळा का काढायचा? या भूमिकेवर ठाम होते. सदरची घटना वाऱ्यासारखी पसरली असतात शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे हे आपल्या शिवसैनिकांसह घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी प्रशासन व ग्रामस्थांशी चर्चा करून महाराजांचे विषयी असलेली अस्था व पुतळा बसविण्याची परवानगी ही शासकीय पातळीवर घेऊन पुतळा संरक्षणाविषयी माहिती दिली. तसेच महाराजांचा पुतळा नियमित परवानगी घेऊन बसवण्यासाठी मी स्वतः सहकार्य करेल,
यावेळी ग्रामस्थांनी स्वतःहून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यास सहमती दर्शवली असता, यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे सह अनेक शिवप्रेमी उपस्थित होते. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य प्रदिप चव्हाण यांनी शासकीय परवानगी घेण्यासाठी सर्व खर्च करणार असल्याची हमी दिली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved