अहमदनगर ब्रेकिंग : ‘ते’संपूर्ण गावच केले होमक्वारंटाईन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :-संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येेथे एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने चांगलीच दक्षता घेतली आहे. या गावातील 323 कुटुंबातील 1 हजार 629 ग्रामस्तांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. 

एक सरकारी वैद्यकीय अधिक्षक व तीन खाजगी डॉक्टर अशा चौघांचे देखील स्वॅब घेण्यात आले असून एकूण 23 जणांना नगर जिल्हा रूग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

त्यामुळे धांदरफळ हे आखं गाव होमक्वारंटाईन करण्यात आले असून नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आतापर्यंत संगमनेरच्या शहरी भागात कोरोनाचे रुग्ण अधिक सापडले होते.

मात्र, संगमनेर तालुक्यातील धांदरफळमध्ये राहणार्‍या एका 68 वर्षीय वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी काल उघड झाली आहे.

या वयोवृद्धाच्या संपर्कात आलेल्या 23 जणांना प्रशासनाने ताब्यात घेतले आहे. या 23 जणांना स्वॅब टेस्टिंग करण्यासाठी जिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले आहे.

काल मृत्यू झालेला कोरोनाचा रुग्ण शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेला होता. तेथेच त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. काल सकाळी त्याचा मृत्यू झाल्यानंतर मुंबईहुन प्राप्त झालेल्या अहवालात

ती व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासनाची झोप उडाली व परिसरात धाकधूक वाढली. कोरोनाबाधीत रुग्ण धांदरफळचा असल्याने संबंधित परिसर सील करण्यात आला आहे. परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment