अहमदनगर ब्रेकिंग : महिला सरपंचास कुऱ्हाडीने बेदम मारहाण

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :- महिला सक्षमीकरणासाठी एकीकडे देशमध्ये नेहमी अनोखे उपक्रम हाती घेतले जात आहे. महिलांच्या सुरक्षितेतकडे लक्ष देण्यासाठी समाजात प्रयन्त केले जात असताना, जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, पारनेर तालुक्यातील बाबुर्डी येथील दोन्ही कुटुंबात जमिनीच्या वादातून रविवारी तुफान हाणामारी झाली.

यात काठ्या,कुर्‍हाडीचा वापर करण्यात आल्याने सुभाष दिवटे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.

अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. याबाबत आशा सुभाष दिवटे यांनी सुपा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली त्यानुसार सहा जणांविरोधात विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News