अहमदनगर कोरोना अपडेट : जाणुन घ्या गेल्या 24 तासांतील अपडेट्स

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १८७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६४ हजार ४६२ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १५१ ने वाढ झाली.

यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १२१५ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ०८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४०, आणि अँटीजेन चाचणीत १०३ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये पारनेर ०४, श्रीगोंदा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १५, अकोले ०१, जामखेड ०१, कर्जत ०३, कोपरगाव ०३, नेवासा ०१, पारनेर ०२, पाथर्डी ०१, राहाता ०४, राहुरी ०३, संगमनेर ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १०३ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा १४, जामखेड ०१, कर्जत ०५, कोपरगाव ०४, नेवासा ०६, पाथर्डी १६, राहाता ०८,राहुरी ०३,

संगमनेर १६, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०९ आणि श्रीरामपूर २० अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा २५, अकोले ०९, जामखेड ०२,

कर्जत ०६, कोपरगाव १३, नगर ग्रामीण १३, नेवासा १५, पारनेर २०, पाथर्डी १३, राहाता १२, राहुरी ०४, संगमनेर ३८, शेवगाव १०, श्रीरामपूर ०६ आणि कॅन्टोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:६४४६२
  • उपचार सुरू असलेले रूग्ण: १२१५
  • मृत्यू:१००१
  • एकूण रूग्ण संख्या:६६६७८
  • अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com 
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe