अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात आज १७१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६२ हजार ७३६ इतकी झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २५२ ने वाढ झाली.
यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १५८९ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ११०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३७ आणि अँटीजेन चाचणीत १०५ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४३, अकोले ०९, जामखेड ०१, कर्जत ०२, कोपरगाव ०४, नगर ग्रामीण १०, नेवासा ०९, पारनेर ०१, पाथर्डी ०६, राहुरी ०५,
संगमनेर ०४, शेवगाव ०४, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर ०६, मिलिटरी हॉस्पिटल ०१, इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १८, अकोले ०२,
कर्जत ०२, कोपर गाव ०४, नगर ग्रामीण ०१, नेवासा ०४, पारनेर ०१, राहुरी ०१, संगमनेर ०२, शेवगाव ०१ आणि श्रीरामपूर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज १०५ जण बाधित आढळुन आले.
यामध्ये, अकोले ०६, जामखेड ०२, कर्जत ०५, कोपरगाव ११, नेवासा ०८, पारनेर १०, पाथर्डी १२, राहाता १०, संगमनेर २८, शेवगाव ०७, श्रीरामपूर ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ११, अकोले ०८, जामखेड ०७, कर्जत ०५, कोपरगाव ११, नगर ग्रामीण ०६, नेवासा ०७, पारनेर ०९,
पाथर्डी १७, राहाता ०४, राहुरी ०६, संगमनेर ३४, शेवगाव ०७, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर २६ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
- बरे झालेली रुग्ण संख्या:६२७३६
- उपचार सुरू असलेले रूग्ण: १५८९
- मृत्यू:९६८
- एकूण रूग्ण संख्या:६५२९३
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved