अहमदनगर कोरोना अपडेट्स : वाचा आजचे अपडेट्स सविस्तर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज २२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६३ हजार ३०५ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १९७ ने वाढ झाली.

यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १५३० इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ६८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४५, आणि अँटीजेन चाचणीत ८४ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४२, अकोले ०१,कर्जत ०१, कोपरगाव ०६, नगर ग्रामीण ०२, नेवासा ०६, पारनेर ०२, पाथर्डी ०५, श्रीगोंदा ०१,

श्रीरामपूर ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १३, अकोले ०२, जामखेड ०१, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ०७, नेवासा ०१,

पारनेर ०२, पाथर्डी ०२, राहाता ०२, राहुरी ०१, संगमनेर ११, शेवगाव ०१, कॅन्टोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज ८४ जण बाधित आढळुन आले.

यामध्ये, अकोले ०३, जामखेड ०४, कर्जत १३, कोपरगाव ०७, नगर ग्रामीण ०७, नेवासा ०४, पाथर्डी ११, राहाता ०४, राहुरी ०७, संगमनेर ०९, शेवगाव ०९, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ५२, अकोले १८, जामखेड ०७, कर्जत ०७, कोपरगाव २२, नगर ग्रामीण ०८, नेवासा १८, पारनेर ०३,

पाथर्डी १६, राहाता १३, राहुरी ०६, संगमनेर ३३, शेवगाव ०७, श्रीगोंदा १०, श्रीरामपूर ०२, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:६३३०५

उपचार सुरू असलेले रूग्ण: १५३०

मृत्यू:९७१

एकूण रूग्ण संख्या:६५८०६

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment