Ahmednagar News : आमदार नीलेश लंकेंना ४४६ कोटींच्या निधीची लॉटरी ! उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शब्द पाळला

Ahmednagarlive24
Published:
Nilesh Lanke

Ahmednagar News : नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पारनेर-नगर मतदारसंघाचे आमदार नीलेश लंके यांना मतदारसंघातील विकास कामांसाठी ४४६ कोटी १० लाख ६० हजार रूपयांचा निधी जाहीर झाला आहे.

मोहटादेवी यात्रोत्सवाप्रसंगी तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आ. लंके यांना वर्षभरात ५०० कोटींचा निधी देण्याचा शब्द दिला होता. अजित पवार यांनी शब्द पाळला असल्याचे आता नागरिकांतून बोलले जात आहे.

मंजूर निधी पुढील प्रमाणे –

१)देवीभोयरे फाटा-पारनेर-सुपा-सारोळा-खडकी रस्ता सुधारणा – ३६० कोटी, पारनेर-बाबुर्डी-विसापूर मार्गासह मोठया पुलाचे बांधकाम करणे – ७ कोटी ५० लाख, वाळवणे-पिंपरीगवळी-रांजणगांव-भोयरेगांगर्डा-पळवे बुदु्क ते प्र रा मा ५ रस्ता मध्ये सुधारणा करणे – ६ कोटी ५० लाख,

प्रजिमा ५२ ते पारनेर-लोणीहेवली माथा प्रजिमा मध्ये सुधारणा करणे – ५ कोटी, देवीभोयरे फाटा-सुपा-सारोळा रस्ता ६९ मध्ये सुधारणा करणे – २ कोटी २० लाख, देवीभोयरे फाटा-सुपा-सारोळा रस्ता सुधारणा करणे – १ कोटी ६० लाख,

पारनेर-जामगांव-भाळवणी रस्ता सुधारणा करणे – १ कोटी ५ लाख, वाळवणे-पिंपरीगवळी-रांजणगांव-भोयरेगांगर्डा-पळवे बुद्रुक रस्ता सुधारणा करणे – २ कोटी २५ लाख, रामा ६९ ते वाळवणे-पिंपरीगवळी-रांजणगांव-भोयरेगांगर्डा पळवे बुद्रुक प्ररामा ५ रस्ता मध्ये सुधारणा करणे – २ कोटी १५ लाख,

कान्हूर-वेसदरे-वडझिरे-चिंचोली-सांगवी सुर्या ते जवळा रस्ता सुधारणा करणे – २ कोटी २५ लाख, शिरापूर-नरसाळेवाडी रस्ता पोहच मार्गासह पुलाचे बांधकाम करणे व रस्त्याची सुधारणा करणे – ३ कोटी ४६ लाख ६० हजार आदींसह जवळपास ४७ कामांसाठी ४४६ कोटी १० लाख ६० हजार रूपयांचा निधी मिळणार आहे.

पारनेर ते सुपा रस्ता चौपदरी होणार
पारनेर शहर ते सुपा रस्ता चार पदरी होणार आहे. देवीभोयरे फाटा ते दौंड रस्ता या रस्त्याच्या कामासाठी ३६० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यातून या ४५ किलोमिटर लांबीच्या रस्त्याचे काम होणार आहे. या रस्त्याच्या माध्यमातून दोन प्रमुख रस्ते जोडले जाणार आहेत.

सहकार मंत्री वळसे पाटील यांचे आभार
वडनेर बुद्रुक ते वडनेर खुर्द या पारनेर व शिरूर तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्याच्या कुकडी नदीवरील पुलासाठी निधी मंजूर करण्यासाठी आपण सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. वळसे पाटील यांनी त्याची दखल घेत पुलासाठी १० कोटींचा निधी मंजूर केल्याबद्दल आमदार नीलेश लंके यांनी आभार व्यक्त केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe