अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-कोरोनाने आता जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात शिरकाव केला असून, पोलिस अधीक्षकांसह इतर एक अशा दोन मोठे अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने पोलिस दलात खळ बळ उडाली आहे.
संपूर्ण जगात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचा आता विळखा आणखी घट्ट होत आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.

काल अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांना कोरोनाची लक्षणे जाणऊ लागल्याने त्यांची कोरोना चाचणी घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे.
त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. नुकतीच त्यांची बदली झाली आहे, मात्र आता त्यांना जिल्हा सोडून जाता येणार नाही. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना देखील
त्रास जाणवल्याने त्यांची अँटिजेन चाचणी घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. एकाच वेळी प्रमुख पोलिस अधिकारी कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने इतर कर्मचारी वर्ग धास्तावला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved