सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- परतीच्या पावसाने जिल्हा व तालुक्यात नुकसान झालेल्या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे. याकरिता प्रशासनाने त्वरित पंचनामे करवे, अशा सूचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात अमृत कलामंच येथे नूतन अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत मंत्री थोरात बोलत होते.

आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, निवासी जिल्हाधिकारी संदीप निचित,

तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, पोलिस निरीक्षक अभय परमार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव ओहोळ,

थोरात बँकेचे अध्यक्ष अमित पंडीत, सभापती मिरा शेटे, सुनंदा जोर्वेकर, अजय फटांगरे, नवनाथ अरगडे, रामहरी कातोरे, शिवाजीराव थोरात, हौशीराम सोनवणे, सिताराम राऊत, सुरेश थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment