मनपाची बससेवा लवकरच सुरू होणार

Ahmednagarlive24
Published:

नगर : शहर बससेवा सुरू करण्यासाठी मनपा प्रशासनाने दीपाली ट्रान्सपोर्टला कार्यारंभ आदेश दिले आहेत. इंदूर येथून लवकरच नवीन बस नगरमध्ये दाखल होणार असून महिनाभरात शहरात पुन्हा एएमटी सेवा सुरू होणार आहे.

यशवंत ऑटो या संस्थेमार्फत यापूर्वी शहर बससेवा चालवली जात होती. १६ महिन्यांत थकलेल्या ८० लाखांची मागणी यशवंत ऑटोकडून मनपाकडे करण्यात येत होती.

तोडगा न निघाल्याने वर्षभरापूर्वी ही सेवा संस्थेने बंद केली. त्यानंतर मनपाने नव्याने बससेवा सुरू करण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment