नामदार बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात घरातूनच नाराजीचे बॉम्ब

Ahmednagarlive24
Published:

नामदार बाळासाहेब थोरात यांच्यावर घरातूनच नाराजीचे बॉम्ब बरसू लागले आहे.अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील अंतर्गत कलह समोर आला आहे.

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्लीच्या हायकमांड सोनिया गांधी यांना पत्र पाठवलं आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत पक्षाला चांगली कामगीरी करता आली नाही. यासाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात जबाबदार आहेत. यामुळे मला पुन्हा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात यावी, असे पत्र ना. अशोक चव्हाण यांनी सोनिया गांधी यांना दिल्याचे वृत्त एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीने दिले आहे.

दरम्यान, अशा कोणत्याही पत्राचा ना.चव्हाण यांनी इन्कार केला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून ना.चव्हाण यांची राजकीय विधाने चर्चेत आहेत. त्यावरून महाविकास आघाडीच्या घटकपक्षांतही धुसफूस झाली.

आता थेट पत्र लिहून त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे सर्वोच्च नेते ना.थोरात यांची तक्रार केल्याने पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्याचे वृत्तात म्हटले आहे.

लोकसभा निवडणूकीतील दारूण पराभवानंतर तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी थोरात यांच्याकडे सोपविण्यात आली. विधानसभा निवडणूकीत पक्षाला 44 जागा मिळाल्या.

राज्यातील महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे पक्षाला सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळाली. महाविकास आघाडीच्या चर्चेत काँग्रेसतर्फे बाळासाहेब थोरात व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पुढाकार होता. सध्या प्रदेशाध्यक्षपदासाठी चव्हाण यांचे पक्षातील प्रतिद्वंदी राजीव सातव यांचे नाव आघाडीवर आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment