अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :- शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे आत्तापर्यत तीन वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे .
शिवसेना शेतकऱ्यांना कर्जाच्या डोंगरातून कबाहेर काढत असताना भाजपचे काही लोकप्रतिनिधी जिल्हा बँकेचे खेळते भांडवल कर्ज स्वरुपात देऊन शेतकऱ्यांना कर्जबाजारी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
असा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशीकांत गाडे यांनी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे नाव न घेता केला . नगर तालुक्यातील पारेवाडी येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा परिषद उपअध्यक्ष शेळके म्हणाले की,
नगर येथील बाजार समितीची शेतकऱ्याची हक्काची दहा एकर जामीन विकण्यासाठी तसेच जिल्हा बँकेचे संचालक पद पदरात पाडण्यासाठी विरोधकांनी गावोगावी बोकड्याच्या पार्टी सुरु केल्या आहेत .
तेव्हा शेतकऱ्यानी त्यांची नळी व एक पळीच्या आहारी जाऊन बाजार समितीवर व जिल्हा बँकेवर पुन्हा संधी देऊ नका. बँकेच्या माध्यमातून एकशे साठ कोटीचे खेळते भांडवल वाटप केले हे सर्व भांडवल कर्ज स्वरूपात दिले आहे . यामुळे एकही सोसायटी उरजीत अवस्थेत राहणार नाही .
शंभर टक्के सोसायटी डबघाईस जाणार आहे . तुमच्या व्याजाचा पैशातून गट वाईज बोकडे खाऊ घालण्याचा कार्यक्रम चालू आहे . दुध संघ विकला आता मार्केटची दहा एकर जागा विकून तेथे मॉल बांधला जाणार आहे . यावेळी शेलार म्हणाले मार्केट कमिटी ताब्यात घेण्यासाठी बोकड्याच्या पार्टी चालू आहेत .
एक नळी ओढली का दहा एकर जागा गेली च समजा .एका नळीत पळी घेतली का शेतकऱ्याच्या मालकीची मार्केट कमिटीची जागा हडप केली जाणार . खेळते भांडवल चार टक्यानी जरी वाटले असले तरी मार्च मध्ये भरायचे म्हणटल्यावर ते बारा टक्के व्याजानी पडणार आहे . बँक व शेतकरी मातीत घालण्याचा धंदा सध्या चालू आहे .
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved