अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-कोरोना महामारीने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. या विषाणूशी लढण्यासाठी वॅक्सीन तयार करण्यासाठी जगभर शास्त्रज्ञ प्रयन्त करू लागले आहे. दरम्यान केंद्राकडून एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे. मोदी सरकारनं कोरोना लसीकरणासाठी गाईडलाईन्स तयार केलेल्या आहेत.
कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लस देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. तसे निर्देश केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना देण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारने जारी केलेल्या गाईडलाईन्समध्ये कोरोना लसीकरण कसं केलं जाईल, तसेच याची संपूर्ण नियमावली राज्यांना पाठवली आहे.

गेल्या आठवड्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं होतं की, कोरोना लस आल्यानंतर ती लोकांपर्यंत कशी पोहोचवण्यात येईल, यासाठी आवश्यक ती सर्व तयारी केली आहे. काय आहेत कोरोना लसीकरणाच्या गाईडलाईन्स लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लस दिली जाणार आहे.
यात हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 50 वर्षांवरील त्या व्यक्ती ज्यांना एखादा आजार आहे. तसेच 50 वर्षांखालील त्या व्यक्ती ज्या मधुमेह, कॅन्सर, हृदयरोग यांसारख्या आजारांनी ग्रस्त आहेत. तसेच सरकारी किंवा खाजगी रुग्णालयांमध्ये काम करणारे डॉक्टर्स, नर्स यांसारखे हेल्थ वर्कर्सना लस देण्यात येणार आहे.
फ्रंटलाइन वर्कर्स म्हणजेच, तिनही सैन्यदलांचे प्रमुख, पॅरा मिलिट्री, म्युनिसिपल वर्कर्स आणि राज्यांतील पोलीस कर्मचारी आदींना लस दिली जाणार आहे. लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन केवळ Co Win वरच करता येणार आहे. हे अॅप केंद्रीय मंत्रालय, राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनद्वारा अपलोड करण्यात येणार आहे.
याव्यतिरिक्त 50 वर्षांवरील व्यक्तींना, जे एखाद्या आजाराने ग्रस्त असतील, ते स्वतः आपली माहिती अपलोड करु शकतील. जर एखादी व्यक्ती स्वतः आपली माहिती अपलोड करत असेल तर त्या व्यक्तीला 15 डॉक्युमेट्सपैकी एखादे ऑफिसरला द्यावे लागेल.
हे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, हेल्थ इंश्युरन्स स्मार्ट कार्ड जे केंद्रीय श्रम मंत्रालयाने जारी केलेले आहे, MNREGA जॉब कार्ड, पॅन कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफसद्वारे जारी करण्यात आलेले पासबुक, पासपोर्ट, पेंशन डॉक्यूमेंट्स, सर्विस आयडेंटीटी कार्ड, वोटर कार्ड.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com