अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :-न्याय मागणेसाठी आलेल्या महिलेस कोतवाली पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास वाघ याने जाळ्यात ओढले होते.
वाघ याने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर वेळोवेळी अत्याचार केला तसेच तिचा गर्भपात केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

लॉकडाऊन काळात हीच फिर्यादी महिला थेट अंमळनेरला दुचाकीवर गेली होती. तेथे जाऊन तिने एका महिलेला मारहाण देखील केली होती.
अंमळनेरला मारहाण झालेल्या विकास वाघ याच्याशी संबंध असणाऱ्या दुसऱ्या एका महिलेने मागील महिन्यात आत्महत्या केली आहे.
आत्महत्या केलेल्या महिलेने वाघ याच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या. त्याची चौकशी चालू असतानाच तिने अंमळनेरला आत्महत्या केली. नाजूक प्रकरणातील दुसऱ्या महिलेने वाघ याच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved