अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-८ डिसेंबर रोजीच्या भारत बंद आंदोलनास कोपरगाव येथील भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी विरोध दर्शविला असून व्यापारी आपले दुकाने बंद न ठेवता सुरू ठेवावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
कोपरगाव मध्ये होणारा बंद हा शेतकरी कृषी विधेयकाच्या विरोधाच्या नावाखाली विरोधकांची राजकीय भूमिका आहे.एके काळी याच विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांनी व त्यांच्या नेत्यांनी कृषी विधेयका बद्दल या पूर्वीच्या काळात समर्थन केलेले आहे.
महाराष्ट्र राज्याने अद्याप हा कायदा स्विकारलेलाच नसतांना बंद पुकारून स्थानिक बाजरपेठ आणि व्यापारी कोरोनामुळे त्रस्त असताना त्यात त्यांची आर्थिक पिळवणूक करणे हे लोकशाही मूल्यांना धरून नाही,
जर विधेयकाचा विरोध करायचा असेल तर लोकशाही मार्गाने तहसीलदार यांना निवेदन देणे, एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणे असे विविध मार्ग आहेत मग तरीही बंद पुकारून बाजारपेठ बंद ठेऊन व्यापाऱ्यांचे नुकसान का करावे..?
व्यापारी बांधवांनी आपले व्यवसाय पूर्ववत सुरू ठेवावे आणि शेतकरी बांधवांनीही कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता हे विधेयक आपल्या हिताचे आहे. त्यामुळे शेतकरी व व्यापारी बांधवांनी दैनंदिन व्यवहार सुरळीत ठेवावे असे नम्र आवाहन त्यांनी केले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved