नेवासा :- औरंगाबादहून अहमदनगरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या ईरटीगा (क्र. एमएच २१ एएक्स ११०) या कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कारने नेवासा फाटा येथील स्टेट बँकेसमोरील दुभाजकाला जोरदार धडक दिली. यानंतर कारने तीन ते चार पलटी खाल्ल्याने गाडीतील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.
अपघात इतका भीषण होता की यात इरटिगा गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून गाडीचे चारही चाक वर झाल्याने गाडीतील मृत व जखमींना बाहेर काढताना मोठी कसरत करावी लागली. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

अपघातात जालना येथील भाजपचे जेष्ठ नेते व विद्यमान जिल्हा सरचिटणीस चंद्रशेखर बाळासाहेब घन (वय ५०, हल्ली रा. औरंगाबाद) यांच्या डोक्याला जबर मार लागून अतिरक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत चंद्रशेखर घन हे प्रगतशील शेतकरी म्हणून देखील जालना व औरंगाबाद जिल्ह्यास परिचित होते.
तसेच त्यांच्याबरोबर असणारे नारायण भिकाजी कुमटे (वय ५०, रा. ता. बदनापूर, जि.जालना) हे या अपघातात गंभीर जखमी झाले. मृत चंद्रशेखर घन हे केंद्रीय मंत्री खासदार रावसाहेब दानवे यांच्या अत्यंत जवळचे व विश्वासू कार्यकर्ते असल्याचे समजते.
- सहा लाखांपेक्षा कमी किमतीत मिळणाऱ्या सहा एअरबॅग्ज असलेल्या टॉप कार्स
- 6500mAh बॅटरी आणि 44W फास्ट चार्जिंग! Vivo Y39 5G दमदार फीचर्ससह लाँच
- PNB च्या ग्राहकांसाठी मोठी संधी ! 400 दिवसांच्या एफडीवर मिळणार 7.75% व्याज, 4 लाखाच्या गुंतवणुकीत किती रिटर्न ?
- Samsung Galaxy M16 5G आणि M06 5G लाँच होताच स्वस्तात विक्रीला Amazon वर बंपर डील्स
- Volvo XC90 नव्या रूपात येणार ! 25 KMPL मायलेज देणारी 7 सीटर SUV