‘मोदी आजोबा, आता शाळेची ओढ लागली, प्लिज कोरोनाला नष्ट करा’ चिमुरडीचे मोदींना पत्र

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- सध्या कोरोनाने सर्वत धुमाकूळ घातला आहे. या आजाराची दहशत तरुणांसोबतच चिमुरड्यांनीही घेतलेली दिसत आहे. लहानगेही आता हा कोरोना नष्ट व्हावा यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत.

याचीच प्रचिती अहमदनगर मधील एका घटनेने आली. कायनेटिक चौकात राहणाऱ्या भक्ती सिद्धार्थ दीक्षित या शाळकरी विद्यार्थिंनीने थेट पंतप्रधानांना पत्र लिहून आपली व्यथा कळविली आहे.

मोदींना तिने आजोबा संबंधून हे पत्र लिहिले आहे. तिने त्यात असे म्हटले आहे की, ‘मोदी आजोबा, आपण भारतासाठी खूप मोठे मोठे उपक्रम केले आहेत. ते यशस्वीही झाले आहेत.

आता आम्हाला शाळेची ओढ लागली आहे. कोरोनाला देशातून आणि संपूर्ण जगातून नष्ट करा,’ असे अर्जव तिने केले आहे. मोदींना तिने आजोबा संबंधून हे पत्र लिहिले आहे.

त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या कामाचे कौतूकही केले आहे. ‘ती म्हणते कोरोना व लॉकडाऊनमुळे खूप कंटाळा आला आहे.

कोरोनामुळे आम्हा विद्यार्थ्यांच्या शाळा, क्लास व इतर उपक्रम बंद आहेत. आम्ही घरात कोंडलोय असे वाटते. आम्हाला करोनामुळे खूप बंधने आहेत. या बंधनातून तुम्हीच मुक्त करू शकता.’

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment