अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा फैलावत आहे. गावपातळीवर कोरोनाचे संक्रमण वाढले असल्याने कोरोनाबाधितांची आकडेवारीत वाढ होत आहे.
दरम्यान काहीच दिवसांपूर्वी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला होता. दरदिवशी रुग्णसंख्येचा आकडा घटत असल्याने दुसरीकडे कोरोनामुक्तांचा आकडा वाढत होता.
तसेच कोरोना रिकव्हरी देखील वाढली आहे. मात्र पुन्हा एकदा कोरोनाचे वाढते आकडे समोर येऊ लागले आहे. जिल्ह्यात पाडव्याच्या दिवशी, सोमवारी दिवसभरात 181 करोना बाधित वाढले.
दिवसभरात करोनामुक्त झालेल्या 169 जणांनी घर गाठले. आजपर्यंत 57 हजार 393 जणांनी करोनावर मात केली आहे. हे प्रमाण 96.34 टक्के आहे. दरम्यान, सध्या जिल्ह्यात 1 हजार 279 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved