अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- जिल्ह्यासह नगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यंत वेगाने वाढतो आहे. जिल्ह्यात दरदिवशी रुग्णांची संख्या ही हजारोंच्या घरात आहे.
यामुळे प्रशासन देखील हतबल झाले आहे. यातच शहरातील अनेक ठिकाणी कंटेन्मेंट झोन जाहिर करण्यात आले आहे.
यातच आता पुन्हा एकदा शहरातील एका अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन जाहिर करण्यात आला आहे.
करोना रूग्णांचे प्रमाण वाढल्यामुळे बोल्हेगाव परिसरात महापालिकेने कटेन्मेंट झोन जाहीर केला आहे.
गांधीनगर रोडवर भराडी सोसायटीमध्ये पश्चिमेस शिंदे यांचे घर, उत्तरेस ओपन स्पेस समोरील कॉलनी, पूर्वेस ओपन स्पेस समोरील घरे,
दक्षिणेस जाधव यांचे घर ते गायकवाड यांचे घर ते शिंदे घर या भागात येत्या 5 मे पर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
या परिसरातील वैद्यकीय सेवेव्यतिरिक्त इतर अत्यावश्यक सेवा, आस्थापने, दुकाने बंद करण्यात आली आहेत. या भागातील वाहतूकीलाही निर्बंध घालण्यात आले आहेत.
दरम्यान नागरिकांनी विनाकरण घराबाहेर पडू नये, तसेच मास्कचा वापर करावा, कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|