अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराचे भूमिपून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेले हे भूमिपूजन अनेकांनी टीकेस पात्र ठरवले.
स्वतः खा. शरद पवार यांनीही यावर भाष्य केले होते. परंतु आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मात्र काही गोष्टींवरून नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे.
स्वातंत्र्य दिनी पंतप्रधानांनी लालकिल्यावरून भाषण करताना महिलांना एक रुपयात सॅनिटरी पॅड देण्याची घोषणा केली. रोहित पवार यांनी पंतप्रधानांच्या या घोषणेचं स्वागत केलं आहे.
तसेच खुद्द पंतप्रधानांनीच या विषयाला हात घातल्याने महिला-भगिनींच्या आरोग्याबाबत प्रत्येकजण संवेदनशीलतेने विचार करेल आणि त्यामुळे समाज सुदृढ होण्यास हातभार लागेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे.
विरोधासाठी विरोध आणि टीका करण्याची पद्धतच सध्या राजकारणात दिसून येते. या पार्श्वभूमिवर चांगल्या योजना आणि घोषणांचे कौतूक करण्याचा हा पवार यांचा प्रयत्न असल्याचे दिसून येते.
रोहित पवार हेही त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून या विषयावर काम करत असल्याची माहिती त्यांनी दिली. बारामती येथील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून बचत गटाच्या महिलांकडून ‘सोबती’ नावाने सॅनिटरी पॅडस् तयार करण्यात येतात.
आतापर्यंत सुमारे अडीच लाख मुलींना ते मोफत देण्यात आले आहेत. त्यासाठी रोहित यांच्या आई सुनंदाताई पवार यांनीही परिश्रम घेतले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved