अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक व्यवहारांचे दरवर्षी लेखापरीक्षण होते. त्यात कोणताही दोष किंवा गैरव्यवहार नसताना कारखान्याचे सभासद नाही,
ऊस पुरवठादार नाही असे सुरेश ताके राजकीय द्वेषातून खोट्या तक्रारी करतात. कारखान्याची, संचालक मंडळ व व्यवस्थापनाची बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन कारवाई व्हावी,
अशी तक्रार कारखान्याचे अध्यक्ष भाऊसाहेब कहांडळ यांनी श्रीरामपूर शहर पोलिस निरीक्षक, जिल्हा पोलिस अधीक्षक, अतिरिक्त अधीक्षकांकडे केली.
पत्रकात म्हटले आहे, ताके हे चुकीच्या बातम्या सोशल मीडियावर मेसेज व्हायरल करतात. त्यामुळे कारखान्याची बदनामी होते. कारखान्याची मालमत्ता २०० कोटी असून १०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करणे म्हणजे तुरीत उंट लपवण्यासारखे आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved