नगर : राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी माजी खासदार स्व. दादापाटील शेळके यांच्या खारे कर्जुने (ता. नगर) येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
या वेळी त्यांच्यासमवेत आमदार सुधीर तांबे, आमदार लहू कानडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. थोरात यांनी शुक्रवारी दुपारी शेळके कुटुंबीयांची भेट घेतली.
दादापाटील शेळके हे शेतीनिष्ठ असे व्यक्तिमत्त्व होते. कृषी, सहकार क्षेत्राचा त्यांचा गाढा अभ्यास होता. सर्वपक्षीयांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.
अजातशत्रू असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते, अशा शब्दांत कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माजी खासदार दादापाटील शेळके यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या.
या वेळी त्यांनी शेळके कुटुंबातील रावसाहेब शेळके, प्रताप शेळके, अंकुश शेळके यांच्याशी, तसेच कुटुंबातील अन्य सदस्यांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. या वेळी त्यांच्याबरोबन नगर तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.