शहरातील कुष्ठधाम रस्त्यावरील बांधकामाला स्थगिती

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- कुष्ठधामलगत असलेल्या भूखंड १२२ मध्ये सुरू बांधकाम विनापरवाना असल्याची तक्रार वैभव जाधव यांनी आयुक्तांकडे केली होती. हे बांधकाम स्थगित करण्याचे आदेश मनपा नगररचना विभागाच्या सहायक संचालकांनी दिले आहेत.

पत्रात सहायक संचालकांनी सावेडी नगररचना योजना ४ अंतिम भूखंड १२२ अ जागेतील रेखांकनास अंतिम मंजुरीबाबत संदर्भ दिला आहे. जागेच्या रेखांकनास तात्पुरती मंजुरी ९ सप्टेंबरला दिली.

अटीनुसार नाला विकसित करणे बंधनकारक आहे. तथापि, अद्याप नाला विकसित केलेला नाही. जागा पाहणी केल्यानंतर भूखंडात विनापरवाना बांधकाम सुरू असल्याचे दिसून आले, ते थांबवून खुलासा करावा, असे सांगण्यात आले. यामुळे या बांधकामाला स्थगिती देण्यात आली आ

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment