नागरिकांना होतोय दूषित पाणी पुरवठा; प्रशासनाला दिला इशारा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :- कर्जत तालुक्यातील मिरजगाव मध्ये गेले तीन महिन्यापासून वार्ड क्रमांक 3 पिण्याच्या पाण्याच्या नळकनेक्शन मध्ये गटारीचे पाणी येत आहे. यापूर्वी केवळ मोटार जळाली म्हणून गावात दहा दिवस पाणी सोडले नाही.

यात ग्रामपंचायत प्रशासनाला गावच्या पाणी पुरवठ्याचे काही देणेघेणे नाही. गावचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला तेव्हा ग्रामपंचायतीचे अधिकारी व प्रशासक नेमके काय करत होते.

यात गावातील अनेक भागात नळाला दूषित पाणीपुरवठा होतो आहे. याविषयी वारंवार तक्रार अर्ज करून पण विकास अधिकारी व प्रशासक यांनी दखल घेतली नाही.

व हे अधिकारी लोकांच्या जीवितासी खेळत आहेत. जर ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी व प्रशासक यांनी आठ दिवसात दखल घेतली नाही तर ग्रामपंचायतला टाळे लावण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

मिरजगाव मध्ये पाणीपुरवठा योजना मंजूर होऊन आलेला निधी स्थानिक पुढाऱ्यांच्या वादामुळे माघारी गेलेला आहे. त्यामुळे मिरजगावमधील प्रलंबित पाणी प्रश्न आणखीन चिघळला आहे.

भविष्यात हा प्रश्न लवकर सुटण्याची कोणतीही चिन्ह नाहीत. त्यामुळे पाणीप्रश्न मार्गी लागावा म्हणून आंदोलन उभे करावे लागणार आहे, असे जनमत तयार होऊ लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News