मस्तच ! स्टेटबँकेच्या ‘ह्या’ नव्या कार्डद्वारे पेट्रोल भरा आणि मिळवा ‘हे’ सारे फायदे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :-जर तुम्हाला प्रवास करण्याची आणि मोटारीचा वापर करण्याची आवड असेल तर एसबीआय कार्डची ही ऑफर तुमच्यासाठी आहे.

एसबीआय कार्डने भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) च्या संयुक्त विद्यमाने ‘बीपीसीएल एसबीआय कार्ड ऑक्टेन’ ‘हे’ एक खास क्रेडिट कार्ड सुरू केले आहे.

या माध्यमातून बीपीसीएल इंधन व मॅक लुब्रिकेंट्स, भारत गॅस एलपीजी (वेबसाइट व अ‍ॅपद्वारे) आणि बीपीसीएलच्या इन एंड आउट सुविधा स्टोर खर्चावर रिवार्ड प्वाइंट्स मिळतील.

एसबीआय कार्डच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बीपीसीएल पेट्रोल पंपांवर इंधन आणि लुबिक्रेंट उत्पादनांवर 7.25% व्हॅल्यूबॅक (1% सरचार्ज सूटसह) आणि भारत गॅस खर्चावरील 6.25% कॅशबॅक मिळेल. या कार्डच्या माध्यमातून आपण डिपार्टमेंटल स्टोअर, किराणा, डाइनिंग आणि मूवीज यासारख्या खर्चावर बचत देखील करू शकता.

* मिनिमम ट्रांजैक्शन लिमिट नाही कार्डधारक या ऑफरचा लाभ देशभरातील बीपीसीएलच्या 17,000 इंधन केंद्रांवर घेऊ शकतात आणि विशेष म्हणजे या ऑफरचा फायदा घेण्याचे किमान बंधन नाही म्हणजेच तुम्ही कितीही कमी खर्च केले तरी त्याचा फायदा तुम्हाला मिळेल. याद्वारे ग्राहक प्रत्येक वेळी या कार्डद्वारे खरेदी करण्यावर बचत करू शकतील.

 बीपीसीएल एसबीआय कार्ड ऑक्टेन चे फायदे

  • – एसबीआय कार्ड वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, वार्षिक सदस्यता शुल्क 1499 रुपये भरल्यावर तुम्हाला वेलकम गिफ्ट म्हणून 1500 बोनस रिवॉर्ड प्वाइंट्स मिळतील. वार्षिक सदस्यता फी भरल्यानंतर 30 दिवसांच्या आत कार्डधारकाच्या खात्यात रिवॉर्ड पॉईंट्स जमा होतील.
  • – बीपीसीएलच्या पेट्रोल पंपांवर इंधन खरेदीवर तुम्हाला 7.25 टक्के व्हॅल्यूबॅक मिळेल. एका बिलिंग सायकलमध्ये जास्तीत जास्त 2500 रिवार्ड प्वाइंट्स मीळू शकतात. चार हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी 6.25 टक्के व्हॅल्यूबॅक आणि 1 टक्के फ्यूल सरचार्ज वेवर मिळेल.
  • – तुम्हाला बीपीसीएल इंधन, वंलुबिक्रेंट्स आणि भारत गॅस (वेबसाइट आणि अ‍ॅपवर) खर्च केलेल्या प्रत्येक 100 रुपयांसाठी 25 रिवॉर्ड प्वाइंट्स मिळतील.
  • – डाइनिंग, डिपार्टमेंटल स्टोर्स ग्रॉसरी आणि चित्रपटांवर खर्च केलेल्या प्रत्येक 100 रुपयांसाठी तुम्हाला 10 रिवॉर्ड प्वाइंट्स मिळतील.
  • – वर्षाकाठी 3 लाख रुपये खर्च केल्यास 2 हजार रुपयांचे गिफ्ट व्हाउचर उपलब्ध होईल. हे गिफ्ट व्हाउचर आदित्य बिर्ला फॅशन किंवा यात्रा किंवा अर्बन लीडर किंवा हुश पपीज किंवा बाटाचे असेल.
  • – 1 लाख रुपयांचे फ्रॉड लाइबिलिटी कवर उपलब्ध आहे. – वर्षाकाठी 2 लाख रुपये खर्च केल्यास पुढील वर्षासाठी फी माफी.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment