शहरातील या सर्व ठिकाणी कोरोना चाचणी केंद्र बंद

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून कमी होताना दिसत आहे. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाचे संकट काहीशे तयार होऊ लागले आहे.

यातच दिवाळीनंतर कोरोना रुग्ण वाढत असताना सिव्हिल हडकोतील चाचणी केंद्र बंद करण्यात आल्याने नागरिकांना अन्यत्र हेलपाटे मारावे लागत आहेत.

दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नसला, तरी २९० नवे रुग्ण आढळून आले. पाच महिन्यांपासून सिव्हिल हडकोत कोरोना चाचणी केंद्र सुरू होते.

दिवाळीनंतर ते बंद पडले. त्यामुळे नागरिकांना खासगी रुग्णालयांत जावे लागत आहे. जिल्ह्यात २४ तासांत रुग्णसंख्येत २९० ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १४२७ झाली आहे.

शुक्रवारी १७० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५८ हजार ३७० झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण ९६.१६ टक्के आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ३६, खासगी प्रयोगशाळेत ८७ आणि अँटीजेन चाचणीत १६७ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा हद्दीतील २४, अकोले ३, कर्जत १, पारनेर २, पाथर्डी १, संगमनेर २, श्रीरामपूर ३ रुग्णांचा समावेश आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment