अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- नगर | राहुरी तालुक्यातील उंबरे येथील जिल्हा रूग्णालयात दाखल केलेल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. या प्रकरणी चाैकशीचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक दर्शनी धांडे यांनी दिले आहेत.
या रुग्णाला ६ सप्टेंबरला दाखल करण्यात आले होते. त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.

आरोग्य विभागाने या प्रकरणाची चाैकशी करून अहवाल सादर करावा, असे आदेश दिले होते. त्यानुसार अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक
डाॅ. धांडे यांनी चाैकशीसाठी समिती नेमली आहे. या समितीत तीन वैद्यकीय अधिकारी असून चाैकशीचा अहवाल तत्काळ सादर करण्याचेही आदेश डाॅ. धांडे यांनी दिले आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved