मनपाचा ‘त्या’ हॉस्पिटलला दणका

Published on -

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :-कोरोना लागण झाल्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना भरमसाठ बिले आकारून त्यांची लुटालूट करणाऱ्या रुग्णालयांना दणका देण्याचे काम नगर महापालिकेने सुरू केले आहे.

शहरातील एकूण 10 हॉस्पिटल्सने रुग्णांकडून जादा आकारलेले २९ लाख १२ हजार ३९० रुपये संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांच्या बँक खात्यात सात दिवसात जमा करण्याचे

आदेश महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिले आहेत. मनपाच्या या आदेशाने शहराच्या वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ व जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी या विषयाचा पाठपुरावा केला होता. आता या रुग्णालयांना त्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या खात्यात पैसे जमा करण्याची सात दिवसांची मुदत दिली आहे.

जर या कालावधीत हे पैसे जमा झाले नाही तर या रुग्णालयांवर साथरोग अधिनियमानुसार कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!