विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Ahmednagarlive24
Published:

कोपरगाव : तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील विवाहितेने वस्तीवरील कांद्याच्या चाळीत गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तालुका पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

याबाबत अधिक माहिती अशी पूजा मयूर नाईक (वय २०, रा. ब्राह्मणगाव) या विवाहितेने त्यांच्या वस्तीवरील कांद्याच्या चाळीत गुरुवारी (दि. २९) सकाळी ११ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. 

याप्रकरणी सुनील अरविंद नाईक यांनी पोलिसांत खबर दिली. यावरून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास मुख्य हवालदार आंधळे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment