तब्बल ५० लाखांचा गैव्यवहार समोर , व्यवस्थापकावर गुन्हा !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील धनगंगा पतसंस्थेचा व्यवस्थापक सचिन बजरंग कवडे याने तारण मालमत्ता व सोनेतारण कर्जात बनावट दाखले बनवून विक्री केल्याचे लेखापरीक्षणात निष्पन्न झाले.

तब्बल ५० लाखांचा गैव्यवहार समोर आला आहे. कवडे २०१८ पासून न्यायालयीन कोठडीत आहे. शहर पोलिसात हा दुसरा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला आहे.

सन २०१७-२० दरम्यान कर्जदारांच्या तारण असलेल्या मालमत्तांचे बनावट दाखले तयार करुन २०१७-१८ लेखा परीक्षणात ३ कोटी ९१ लाख ६१ हजार २५४ रुपयांचा अपहार कवडे याने केल्याचे समोर आले होते.

२०१७ मध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. त्याला २ जानेवारी २०१८ रोजी अटक करण्यात आली. २०१८-१९ च्या लेखा परीक्षणात कवडेने ४६ लाख ४७ हजार ३०७ रुपयांच्या मालमत्तेची परस्पर विक्री केली.

सोनेतारण कर्जात २ लाख १२ हजार ९८० रुपये असा एकूण ४८ लाख ६० हजार २६७ अपहार केल्याचे समोर आले. अजय केशव राऊत (लेखापरीक्षक, निमज, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कवडेवर पुन्हा अफरातफर व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment