अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंबंधी रामदास लखा बांडे (वय ४०, रा. खडकी, ता. अकोले) यांनी तक्रार दिली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, खडकी गावातून आपण पायी जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने एक गाडी आली. आम्हाला कट मारून ती पुढे गेली. कोणी तरी पर्यटक असावेत म्हणून आम्ही जोरात ओरडून गाडी हळू चालवा असे म्हणालो.
त्यावर काही अंतरावर जाऊन ती गाडी थांबली. त्यातून आमदार लहामटे उतरले व म्हणाले, मला ओळखले का मी कोण आहे. असे म्हणून माझ्या पोटात त्यांनी लाथ मारली व शिवीगाळ करून ते निघून गेले.
दरम्यान रामदास बांडे यांच्या तक्रारीवरून राजूर पोलीस ठाण्यात आमदार लहामटे यांच्याविरूद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved