अहमदनगर ब्रेकिंग : तरुणाची हत्या करून मृतदेह फेकला पाण्यात !

Ahmednagarlive24
Published:

श्रीरामपूर – श्रीरामपूर शहरातील सूतगिरणी रोड परिसरात राहणारे रामदास भिमराव कडनोर, वय ३४ यांचा टणक हत्याराने डोक्यात मारहाण करुन खून करण्यात आला.

हा खुन करुन रामदास कडनोर यांचा मृतदेह प्रवरा कॅनॉलमध्ये वाहत्या पाण्यात टाकून देण्यात आला. हा प्रकार १५ ऑगस्ट रोजी वार्ड नं. २ येथील पाटाच्या पाण्यात हा मृतदेह आढळला व खुनाचा प्रकार उघड झाला. त्यावेळी घटनास्थळी डिवायएसपी मदने, पोनि बहिरट, सपोनि पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली होती.

पाण्यातून रामदास कडनोर या इसमाचा मृतदेह पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

तेव्हा रामदास यांच्या डोक्यात काहीतरी लोखंडी हत्याराने मारुन डोके फोडून खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. पो. ना. अमोल जाधव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध भादवि कलम ३०२ प्रमाणे काल खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पो.नि. बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली स पो नि पाटील हे खून करणाऱ्या आरोपीचा कसून शोध घेत आहेत. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment