दरेकर म्हणजे चहापेक्षा किटली गरम पालकमंत्र्यांची टीका

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-  एकनाथ खडसे यांच्या होऊ घातलेल्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशवरून काल भाजपाचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर शरसंधान साधले.

राष्ट्रवादी काँग्रेस नाथाभाऊंचा माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकाटिपणीसाठी करीत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला.

याकडे लक्ष वेधले असता मंत्री मुश्रीफ म्हणाले, नाथाभाऊ जी टीका करीत आहेत,ती आज नव्हे. मागील चार वर्षापासून ते त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची बाजू मांडत आहेत.

याबाबत नाथाभाऊ प्रत्यक्ष विधानसभेत बोलले आहेत. त्यामुळे फडणवीस अथवा भाजपवर टीका करण्यासाठी नाथाभाऊचा वापर केला जात असल्याच्या

आरोपात तथ्य नाही. दरेकर यांचे वक्तव्य म्हणजे चहापेक्षा किटली गरम अशीच परिस्थिती असल्याची टीका मंत्री मुश्रीफ यांनी केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment