वंचित शेतकऱ्यांनाही मिळणार अवकाळीची भरपाई : मंत्री गडाख

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- सोनई गेल्या वर्षीच्या अवकाळी पावसामुळे बाधीत झालेल्या शेतपिकाचे पंचनामे होऊन देखील नेवासे तालुक्यातील दहा हजारांवर शेतकऱ्यांना पहिल्या व दुसऱ्या हप्त्यातील वाटपात शासकीय नुकसान भरपाई मिळाली नव्हती.

वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई आता मंजूर करण्यात आली असून त्याची रक्कमही जिल्हा अधिकाऱ्यांकडून तहसील कार्यालयाकडे वर्ग झाली असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.

गेल्या वर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यात कापूस, सोयाबीन, बाजरी, कांदा, तूर, या बरोबरच घास व मका इत्यादी चारा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

तालुक्यात डाळिंब, पेरू, केळी या फळ पिकाखाली सुद्धा मोठे क्षेत्र असून अतिवृष्टीचा मोठा फटका फळबागांनाही बसला होता. आपण स्वत: लक्ष घालून तालुक्यातील सर्व बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या.

तालुक्यातील एकूण ५३ हजार ६४० हेक्टर बाधित क्षेत्राच्या भरपाईचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला होता. त्यापैकी जवळपास साडेआठ हजार हेक्टरची भरपाई मिळाली नव्हती. त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर राहिलेल्या बाधित क्षेत्रालाही भरपाई मंजूर करण्यात आली.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment