कोरोनामुळे डॉक्टर व तलाठ्याचा मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- राहुरी शहरातील ६७ वर्षांच्या स्त्री रोग तज्ज्ञ आणि टाकळीमिया येथील ३२ वर्षांच्या तलाठ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तालुक्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या संख्या २९ वर जाऊन पोहोचली आहे.

आतापर्यंत ७४५ नागरिकांना बाधा झाली होती. त्यातील ४५० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्णांवर महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कोविड सेंटर, तसेच राहुरी फॅक्टरी येथील नर्सिंग होममध्ये उपचार सुरू आहेत.

दरम्यान नगर शहर व जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाने आणखी २० जणांचे बळी घेतले. बळींची एकूण संख्या ४०९ झाली आहे.

दिवसभरात आणखी ७६६ पॉझिटिव्ह आढळून आले. बाधितांची संख्या आता २७ हजार ८७५ झाली आहे. जिल्ह्यात ४ हजार २२५ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment