अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- उत्तरनगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहरप्रमुख कलविंदरसिंग दडीयाल यांच्या सूचनेप्रमाणे कोपरगाव शहर शिवसेनेची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.
उपशहरप्रमुख – विकास शर्मा, प्रफुल्ल शिंगाडे, गोपाल वैरागळ, गगन हाडा, भूषण पाटणकर, आकाश कानडे, शहर संघटक – बाळासाहेब साळुंके व नितीन राऊत, सहसंघटक – वैभव गिते, विभागप्रमुख – विजय शिंदे, दीपक बरदे,
जयेश हसवाल, समीर शेख, रफिक शेख, मयूर दळवी, सौरव गायकवाड, शैलेश वाघ, किरण गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी झावरे म्हणाले, पक्षाची बदनामी होईल असे वागू नका.
शिवसेनेशी, पक्षप्रमुखांशी व आपल्या पदाशी प्रामाणिक रहा. पदावर राहून दुसऱ्या पक्षाचं काम करू नका, पदाचा मान राखा. पक्षाचं ध्येय, धोरण व विचार प्रत्येक घरात पोहचवण्याचा यशस्वी प्रयत्न करा.
दडीयाल म्हणाले, खांद्याला खांदा लावून काम करायचे आहे. फक्त सोशल मीडियावर काम करणाऱ्यांएेवजी खरे काम करणाऱ्यांना पदे दिली आहेत. जो कोणी पक्षाच्या ध्येय- धोरणा विरोधात काम करेल त्याच्यावर तातडीने कारवाई करण्यात येईल.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved