जिल्हा विकासासाठी द्विवेदी यांचे कार्य प्रेरक

Published on -

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्याच्या विकासात मावळते जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे पथदर्शी व प्रेरक आहे, असे प्रतिपादन जिल्हा वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष विश्वनाथ राऊत यांनी केले. सेवा संघातर्फे जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या कृतज्ञता सोहळ्याप्रसंगी ते बोलत होेते.

याप्रसंगी जिल्ह्याचे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, माजी महापौर भगवान फुलसौंदर, सुनिल साखरे, भिंगार अर्बन बँकेचे अध्यक्ष अनिल झोडगे, संचालक नाथाजी राऊत, सुभाष राऊत, संचालक चौधरी, बँकेचे व्यवस्थापक हजारे,

विशाल वालकर उपस्थित होते. फुलसौंदर म्हणाले, कोविडच्या संघर्षमय परिस्थिती, सीना नदी रुंदीकरण, कायदा सुरक्षा व्यवस्था याबाबत धोरणात्मक निर्णय व कृती केली.

नगरच्या विकासात जिल्हाधिकारी द्विवेदी यांचे योगदान नगरकर कधीही विसरणार नाही. द्विवेदी यांचा राऊत व सुनील साखरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!