अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-सध्याच्या परिस्थितीनुसार सोन्याच्या किंमती ऐकनूच समाधान मानणारे सर्वसामान्य नागरिक सोने खरेदीचा विचारही करू शकत नाही. मात्र चक्क शहरात एका रिक्षामधून तब्बल एक किलोहून अधिक सोन संशयास्पद घेऊन जाणाऱ्यास पोलिसांनी पकडले आहे.
दरम्यान या जप्त केलेल्या सोन्याची किंमत 56 लाख 89 हजार 690 रूपये आहे, तसेच पोलिसांनी या प्रकरणी फैरोज रफीक पठाण (रा. बाबा बंगाली, नगर) याला अटक केली आहे. कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान, ही सोन्याची बॅग पठाण याला गंजबाजार परिसरात सापडली असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे.
याप्रकरणी पठाण विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, कोतवाली पोलिसांचे पथक बाबा बंगाली परिसरात गस्त घालत असताना संशयास्पद रिक्षा दिसून आली. या रिक्षा चालकाला थांबविण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाऊ लागला.
पोलिसांना संशय आल्याने त्यांनी रिक्षा चालकाला पकडले. त्याचे नाव विचारले असता त्याने फैरोज पठाण असे सांगितले. रिक्षाची झडती घेतली असता रिक्षामध्ये 1 किलो 368 ग्रॅम सोने असलेली बॅग मिळून आली. या सोन्या विषयी त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने पोलिसांना ठोस पुरावे दिले नाही.
पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved