शेतीपंपाच्या विस्कळीत वीज पुरवठ्याने शेतकरी हैराण; महावितरण समोर निदर्शने

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-जामखेड (जि. अहमदनगर) तालुक्यातील जवळा परिसरातील शेतीपंपांचा वीज पुरवठा सातत्याने विस्कळीत होत आहे. वीजेच्या विस्कळीतपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होवून त्यांना त्रासाचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान वीज पुरवठा सुरळीत व पुरेशा दाबाने होण्याची मागणी करत जवळा ग्रामपंचायतीच्या सदस्या आरती दीपक देवमाने यांनी महावितरण प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे.

महावितरणचे कनिष्ठ अभियंता यांच्याकडून येत्या ५ दिवसात पूर्ण दाबाने वीज उपलब्ध करून देऊ, असे लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलनकर्त्या देवमाने यांनी आंदोलन मागे घेतले.

जवळा येथील शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नी ५ एप्रिल रोजी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता योगेश कासलीवाल यांना निवेदन देण्यात आले होते.

दोन दिवसात शेती पंपाचा वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने महावितरणच्या कार्यलयासमोर ८ एप्रिल रोजी ग्रामपंचायत सदस्या आरती देवमाने यांनी सकाळी ११ वाजता महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

जवळा परिसरातील शेतीपंपांना दोन-तीन महिन्यांपासून कमी दाबाने वीज मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. सरपंच प्रशांत शिंदे यांनीही आंदोलनास पाठिंबा दिला.

पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पुढाकार घेत महावितरण अधिकारी यांच्या बरोबर चर्चा केली. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe