जागतिक दिव्यांग दिनी दिव्यांग खेळाडू व लघु उद्योजक माने पिता-पुत्राचा गौरव

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालयात जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिव्यांग खेळाडू अभिजीत माने व लघु उद्योजक जगन्नाथ माने या दिव्यांग पिता-पुत्राचा गौरव करण्यात आला.

जिल्हा समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे यांच्या हस्ते माने याला प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी रश्मी पांडव, दिनकरराव नाठे, अलीम शेख, विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय आरोटे आदि उपस्थित होते. जिल्हा समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे म्हणाले की, दिव्यांग असलेले जगन्नाथ माने व त्यांचा मुलगा अभिजीत माने यांनी शुन्यातून विश्‍व निर्माण केले.

या दिव्यांग बाप-लेकाचा प्रेरणादायी प्रवास इतरांसाठी दिशादर्शक आहे. परिस्थितीवर मात करुन एक यशस्वी खेळाडू घडविण्यात आला आहे. तर जगन्नाथ माने यांनी दिव्यांगावर मात करीत लघु उद्योजक पर्यंतचा गाठलेला प्रवास थक्क करणारा आहे. असे विद्यार्थी घडविणारी शाळा, शिक्षक व दिशादर्शक असलेले वडिल यांचे कार्य कौतुकास्पद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

जगन्नाथ माने यांनी दिव्यांगाना प्रोत्साहन देऊन त्यांनी निर्माण केलेल्या वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले. जगन्नाथ माने यांचे चिरंजीव असलेले अभिजीत माने हे मतीमंद दिव्यांग खेळाडू असून, तो एक उत्कृष्ट जलतरणपटू व मंतीमंद मुलांची शाळा टिळकरोड येथील विद्यार्थी आहे. त्यांनी जिल्हास्तरीय दिव्यांग जलतरण स्पर्धेत सलग चौथ्यांदा प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला आहे. तर राज्यस्तरीय स्पर्धेत देखील उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे.

तर त्याचे वडिल जगन्नाथ माने एका छोट्या कंपनीची संचालकपदाची धुरा सांभाळून एलईडी स्ट्रीट लाईटचे उत्पादन करीत आहे. दिव्यांग खेळाडू व लघू उद्योजक ठरलेले माने पिता-पुत्राचा या कार्यक्रमात विशेष सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी सिकंदर शेख, दत्तात्रय आढाव व सतीश दगडे यांचा देखील दिव्यांग पुरस्कार देऊन सत्कार झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदाम चौधरी यांनी केले. आभार ज्योती जाधव यांनी मानले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment