अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-६० शिक्षक व ३० विद्यार्थी ही परिस्थिती झाल्याने शिक्षणाचे धडे कुणाला देणार? हा सवाल वांबोरीच्या महेश मुनोत शाळेत निर्माण झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल आठ महिन्यांपासून बंद असलेली वांबोरीची महेश मुनोत शाळेचे माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्ग नियमित सुरू झाल्याने बऱ्यापैकी विद्यार्थी हजेरी लावतील, अशी अपेक्षा होती. मात्र, शुक्रवारी पहिल्याच दिवशी अवघ्या ३० विद्यार्थ्यांनी हजेरी लावल्याने विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकांचीच संख्या जास्त ठरली.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये ही खबरदारी घेऊन शाळा बंद असल्याने आजवर ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे देण्याचे काम सुरू होते. मात्र, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरू करण्याचे आदेश शासनाने दिल्याने शुक्रवारपासून शाळेची घंटा वाजली.
या शाळेत अध्यापनाचे काम करणाऱ्या शिक्षकांची आठवडेभरापूर्वी कोरोना तपासणी करण्यात आली होती, तर शुक्रवारी हजेरी लावलेल्या ३० विद्यार्थ्यांची देखील तापमापक यंत्राने तपासणी करून शाळेत प्रवेश देण्यात आला. शाळा उघडणार असल्याचा संदेश विद्यार्थ्यांसह पालकांना देण्यात आला होता.
मात्र, कोरोनाच्या भीतीने विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरवली. विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी संभाजी पवार, तुषार मरकड, बाबासाहेब पटारे, राजेंद्र कुसमुडे, अनिल लोहकरे, संजय तमनर, संगीता कोळी, रेखा आघाव, ज्योत्स्ना तोडमल, अनिकेत पाठक, शिवाजी मंडलिक, नीलेश भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली समित्या गठित केल्या आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved