अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- आमदारांनी मोठा गाजावाजा करून कोपरगावला कोविड सेंटर सुरू केले, परंतु तेथे रुग्णांची सोय होण्याऐवजी गैरसोयच होते. रुग्णांची फसवणूक होत अाहे. ऑक्सिजन, व्हेंटीलेटर आता उपलब्ध करणे म्हणजे उशिरा सूचलेले शहाणपण आहे,
अशी टीका कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष अप्पासाहेब दवंगे यांनी केली. कोरोना रुग्णांची संख्येत वाढ होत असल्याने सरकारने आमदारांना विकास निधीतून साहित्य उपलब्ध करण्याची सूचना केली होती. रुग्णांना स्वतःच्या तालुक्यात आॅक्सिजन, बेड,
व्हेंटीलेटर आदी कोणत्याही सोयसुविधा नसल्याने नाईलाजस्तव दुसऱ्या तालुक्यात जावे लागते. आमदारांनी विकास निधीचा उपयोग करुन साहित्य उपलब्ध केले असते, तर तालुक्यातील ३१ रुग्णांचा मृत्यू झाला नसता, असे दवंगे म्हणाले. लाॅकडाऊनमुळे व्यावसायांवर मोठा परिणाम झाल्याने आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.
आर्थिक परिस्थितीमुळे खासगी रुग्णालयांत उपचार घेणे परवडत नाही. मोठा गाजावाजा करून उभारलेल्या कोविड सेंटरचा आसरा घेणाऱ्या रुग्णांचा भ्रमनिरास होत आहे. तेथील दुरवस्थेमुळे रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. एसएसजीएम काॅलेज येथे कोविड सेंटर उभारण्यात आल्याचा मोठा गाजावाजा केला,
केवळ बैठका घेऊन जनतेप्रती कळवळा दाखवला जातो, मात्र कार्यवाही होत नाही. प्रशासनानेही लोकप्रतिनिधींच्या कामगिरीचे कौतुक केल्याचे मथळे वृत्तपत्रात छापून आणले, परंतु बातम्यांशिवाय नागरिकांच्या हाती काहीही पडले नाही. दाखल करून घेतलेल्या रुग्णांना उपचार वेळेवर मिळत नाही,
त्यांची हेळसांड होते, आॅक्सिजनची सोय नाही. नगरला जाईपर्यंत दुर्दैवाने काही अघटित घडते. या ठिकाणी सर्वसोयींयुक्त कोविड सेंटर उभारण्याची गरज असताना केवळ बैठका आणि बातम्या देण्यास प्राधान्य दिले जाते, ही दुर्दैवाची बाब आहे. तालुक्यातील कोरोना संकट हाताळण्यात लोकप्रतिनिधींना पूर्ण अपयश आले असल्याचा आरोप दवंगे यांनी केला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved