अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी केंद्र शासनाने शेतीमाल शहरात पाठवण्यासाठी कोपरगाव रेल्वे स्थानकातून किसान स्पेशल एक्सप्रेसची सोय केली आहे.
दर मंगळवार, गुरुवार व शनिवार असे दिवस ही रेल्वे धावेल, अशी माहिती स्टेशन मास्तर एच. एल. मीना यांनी दिली. शेतकऱ्यांना ही आनंदाची बातमी अाहे.
त्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी अधिक माहिती देताना स्टेशन मास्तर एच. एल. मीना म्हणाले की, ही किसन स्पेशल एक्सप्रेस कोपरगाव होऊन दानापूर मुजफ्फरपूर बिहार येथे शेतीमाल घेऊन जात आहे
शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल कोपरगाव रेल्वे स्थानकात बुकिंग करावा त्यावर शेतकऱ्यांना 50 टक्के सबसिडी भाड्यामध्ये दिली जात आहे.
सध्या कोपरगाव रेल्वे स्थानकातून गोवा निजामुद्दीन एक्सप्रेस पुणे, दानापुर एक्सप्रेस कोल्हापूर, गोंदिया, महाराष्ट्र एक्सप्रेस हुबळी, वाराणसी एक्सप्रेस कर्नाटका,
बेंगलोर दिल्ली एक्सप्रेस व पुणे गोरखपुर एक्सप्रेस अशा सहा गाड्या दिवाळी सणाच्या प्रवासी सेवेसाठी सुरू झाल्या आहेत. साईभक्तांसाठी व रेल्वे प्रवाशांसाठी जास्तीत जास्त सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात
यासाठी स्थानिक रेल्वे स्थानक रेल्वेस्थानक समिती’चे अध्यक्ष कैलास चंद्र ठोळे हे सातत्याने केंद्र व राज्य शासन स्तरावर सतत लेखी पाठपुरावा करत असतात. त्यांनीही या किसान स्पेशल एक्सप्रेसचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा म्हणून आवाहन केले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved