अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : अकोले तालुक्यातील चिचोंडी शिवारातील कृष्णवंती नदीत सापडलेल्या तरुणाच्या मृतदेहाचे गूढ उलगडले आहे.
दारू पिण्यासाठी वारंवार पैसे मागत असल्याने ७० वर्षीय आजोबानेच स्वतःच्या नातवाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार तपासात समोर आला.
प्रदीप सुरेश भांगरे (२५, रा. खिरविरे, ता. अकोला) असे या मृत तरुणाचे नाव आहे. कमलाकर हनुमंत डगळे (७०, रा. खिरविरे, ता. अकोले) व हरिचंद्र कमलाकर डगळे (३५, रा. खिरविरे,, हल्ली रा. यवत, ता. दौंड, जि. पुणे) अशी खून करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.
राजूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चिचोंडी शिवारातील कृष्णावंती नदीत दोन पोत्यांमध्ये तरुणाच्या मृतदेहाचे तुकडे दोन दिवसांपूर्वी पोलिसांना मिळाले होते.
मृत प्रदीप सुरेश भांगरे हा दारू पिण्यासाठी नेहमी पैशाची मागणी करून त्रास देत होता. २७ जूनला संध्याकाळी प्रदीप त्याच्या मोटारसायकलने घरी आला.
दारूसाठी पैसे मागत असल्याने आमच्यात वाद झाला. रागातून कोयत्याने वार करून त्याची हत्या केली असल्याची कबुली आरोपी आजोबाने दिली. प्रेताचे नऊ तुकडे करून ते दोन गोण्यांमध्ये भरून शेततळ्यात टाकले.
मोटारसायकल बाभूळवंडी शिवारातील रस्त्याचे कडेला झुडपात टाकली. त्यानंतर मुलगा हरिचंद्र याला बोलावून दोघांनी मिळून प्रेताच्या गोण्या बाहेर काढून त्या दुचाकीवरून नेऊन कृष्णावंती नदीत फेकल्याचे आरोपीने सांगितले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews